संबलपूर (ओडिशा) येथील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरील आक्रमण पूर्वनियोजित ! – पोलीस
भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशातील संबलपूरमध्ये १४ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले होते. पोलिसांनी हे आक्रमण पूर्वनियोजित असल्याचे म्हटले आहे. हे आक्रमण धार्मिक नव्हते, असा दावाही पोलिसांनी केला आहे. यात आक्रमणात चंद्र मिर्झा याचा मृत्यू झाला आहे.
#ओडिशा प्रदेश भाजपा अध्यक्ष #मनमोहन_सामल ने कहा कि संबलपुर में की हनुमान जयंती बाइक रैली पर हिंसा पूर्व नियोजित साजिश । घटना पर मुख्यमंत्री मुँह न खोलना दुर्भाग्यपूर्ण है ।
— Hindusthan Samachar News Agency (@hsnews1948) April 13, 2023
पोलिसांचे म्हणणे आहे की, काही लोकांनी त्यांच्या घरात लाठ्या-काठ्या आणि दगड आधीच जमा करून ठेवले होते. काहींनी घरांवर दगड जमा करून ठेवले होते. घरांची झडती घेतल्यावर हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी १०० दंगेखोरांची ओळख पटवली असून अद्याप २६ जणांना अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारचा कट कोण रचत आहे, हे गुप्तचरांना कसे कळत नाही ? |