सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या आक्रमणात ३१ नागरिक ठार
दमास्क (सीरिया) – इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी सीरियाच्या हामा प्रदेशात मशरूम काढण्यासाठी गेलेल्या ३१ लोकांना ठार मारले. सध्याच्या वातावरणात सीरियातील लोक वाळवंटात मशरूम गोळा करायला जातात. या मशरूमचे त्यांना अधिक मूल्य मिळते.
रेगिस्तान में मशरूम चुन रहे 31 लोगों को इस्लामिक स्टेट ने उतारा मौत के घाट, सीरिया में ISIS का खूनी खेल #syria #isis #सीरिया #आईएसआईएस https://t.co/nrp5Z46mi2
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) April 17, 2023
आतंकवाद्यांनी येथील वाळवंटामध्ये सर्वत्र भूसुरुंग पेरलेले आहेत. याविषयी प्रशासनाकडून लोकांना सूचना देण्यात आल्या असतांनाही ते मशरूम काढण्यासाठी जात असल्याने भूसुरुंगांचा स्फोट होऊन त्यांचा मृत्यू होत आहे. फेब्रुवारीपासून आतापर्यंत २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याआधी मोटार सायकलवरून आलेल्या आतंकवाद्यांनी मशरूम काढत असलेल्या लोकांवर गोळीबार करून अनुमाने ६८ जणांना ठार मारले होते.