अमृतसर येथे अज्ञाताकडून भाजपच्या नेत्यावर जीवघेणे आक्रमण !
पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
अमृतसर (पंजाब) – एका अज्ञात आक्रमणकर्त्याने भाजपच्या अनुसचित जाती विभागाचे महासचिव बलविंदर गिल यांच्यावर त्यांच्या घराबाहेर गोळीबार केला. या वेळी गिल यांच्या जबड्याला गोळी लागली असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गोळीबार करणारा घटनास्थळावरून लगेच पसार झाला. त्याच्यासमवेत अन्य एक व्यक्तीही होती. अमृतसरहून २५ किलोमीटर दूर असलेल्या जंडियाला गुरु येथे ही घटना घडली.
Punjab: ‘पापा को बुलाओ…’ उसके बाद हमलावरों ने भाजपा नेता को मार दी गोली
https://t.co/79ArwzYC6O— Jansatta (@Jansatta) April 17, 2023
पोलीस अधीक्षक जुगराज सिंह यांनी सांगितले की, या घटनेचे अन्वेषण करण्यासाठी पोलिसांचे अनेक गट निर्माण करण्यात आले असून त्यांना घटनास्थळी विविध पुरावे हाती लागले आहेत.