तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला अटक !
बंगालमधील ५०० कोटी रुपयांचा शिक्षक भरती घोटाळ्याचे प्रकरण
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील ५०० कोटी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्ण साहा यांना अटक केली आहे. यापूर्वी या घोटाळ्याच्या प्रकरणी तृणमूलचे आमदार, तसेच माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटजी आणि आमदार माणिक भट्टाचार्य यांना अटक करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल के शिक्षक भर्ती घोटाला मामले में सीबीआई ने लंबी पूछताछ के बाद टीएमसी विधायक जीवन कृष्ण साहा को हिरासत में ले लिया है.#SSCScamhttps://t.co/ArF4z4ub7d
— AajTak (@aajtak) April 17, 2023
या प्रकरणी भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी म्हणाले की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने ‘वसुली आयोग’ चालू ठेवला होता. यात त्यांचे लोकप्रतिनिधी दलालाचे काम करत होते.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचार्यांचा पक्ष झालेला तृणमूल काँग्रेस ! अशा पक्षांवर बंदी घातली पाहिजे ! |