उपचारांच्या नावाखाली लंडन येथे पसार झालेले पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकमध्ये परतणार !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ (पी.एम्.एल्.-एन्.) पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ पाकिस्तानमध्ये होणार्या सार्वजनिक निवडणुकांमध्ये नेतृत्व करण्यासाठी पाकमध्ये परतणार आहेत, अशी माहिती पाकचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिली.
Pakistan: बीमारी का बहाना बना कैद से बचकर ब्रिटेन भागे नवाज शरीफ लौटेंगे पाकिस्तान! गृह मंत्री ने किया दावा#Pakistan #NawazSharif #PMLN #PakistanElection #PakistanEconomyhttps://t.co/P3wIGDQVRc
— Amar Ujala (@AmarUjalaNews) April 17, 2023
नवाझ शरीफ लंडन येथे पसार झाले होते. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. उपचारांसाठी ते लंडन येथे गेले होते; मात्र तेथून ते परतलेच नव्हते. आता पाकमध्ये त्यांच्या पक्षाचे आघाडी सरकार असतांना ते पुन्हा पाकमध्ये परतणार आहेत.