इटलीमध्ये पाण्याखाली सापडले नबातियन संस्कृतीशी संबंधित प्राचीन मंदिर !

रोम (इटली) – इटलीतील पॉज्जुओली बंदर परिसरात पाण्याच्या खाली नबातियन संस्कृतीशी संबंधित एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. नबातियन संस्कृतीचे लोक ‘दसहरा’ देवाची पूजा करायचे. नबातियन संस्कृतीत दसहराला ‘डोंगरांची देवता’देखील म्हटले जाते. मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर आता पुढील शोधकाम चालू करण्यात आले आहे. मंदिराची आणखी माहिती गोळा केली जात आहे. यामुळे इटलीच्या प्राचीन शहराचा इतिहास आणि त्याचे आणखी काही पैलू समोर येऊ शकतात.

इटलीच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी या संशोधनाविषयी आनंद व्यक्त केला आहे. प्राचीन पॉज्जुओलीमधून आणखी खजिना मिळाला आहे. त्यामुळे या परिसराचे सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यापारी महत्त्व पुन्हा स्पष्ट झाले आहे, असे मंत्री म्हणाले.