दंडाचा स्वामी कर्तव्यच्युत असेल, तर तो स्वतःसह राज्याचा विनाश घडवून आणतो
‘जे नाही ते प्राप्त करण्यासाठी; जे प्राप्त झालेले आहे, ते वर्धिष्णू होण्यासाठी; जे वर्धित झाले आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी; जे वर्धित आणि संरक्षित असे संचित आहे, त्याचे समाजात सर्वत्र समप्रमाणात वितरित करण्यासाठी राजा आणि दंडसत्ता हवी. अट एकच, दंडाचा स्वामी निर्मोही आणि इंद्रियजित असावा; पण तोच जर मोहित आणि भ्याड (कर्तव्यच्युत) असेल, तर तो स्वतःसह त्या राज्याचा विनाश घडवून आणतो.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ६.१.२०११)