आपलेपणाने, सहजतेने आणि अल्प वेळेत सुंदर मेंदी काढणारी रामनाथी आश्रमातील कु. निकिता झरकर !
‘कु. निकिता झरकर ही रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करते. मी नुकतीच तिच्या खोलीत रहायला गेले. एके दिवशी तिने दिवसभर स्वयंपाकघरात सेवा केली होती आणि दुसर्या दिवशी सकाळी तिला बाहेरगावी जायचे होते. असे असूनही केवळ ‘आम्हाला आनंद मिळावा’, यासाठी तिने त्या रात्री जागून माझ्या आणि खोलीतील अन्य एका साधिकेच्या तळहातावर अगदी सहजतेने आणि विशेष म्हणजे आपलेपणाने अल्प वेळेत सुंदर मेंदी काढून दिली.’ – कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.४.२०२३)