मनाला साधनेची ओढ लागल्यावर तळमळीने साधना करणार्या आणि सेवा करायला शिकून केवळ एक ते दीड वर्षात समष्टी साधना करून ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. पूजा परशुराम पाटील (वय ५० वर्षे) !
सौ. पूजा परशुराम पाटील यांचे यजमान श्री. परशुराम पाटील हे सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत असून ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी रहातात. त्यांच्या पत्नी सौ. पूजा आरंभी साधना म्हणून कर्मकांड करायच्या. दळणवळण बंदी चालू झाल्यावर त्यांना सनातन संस्था सांगत असलेली साधना करण्याची ओढ निर्माण झाली. त्या समवेत त्यांची सेवा करण्याची तळमळही वाढली. सेवा करता येण्यासाठी त्यांना सेवेच्या संदर्भातील अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या. त्यांनी कुठलीही सेवा ‘मला येत नाही’, असा विचार करून सोडून दिली नाही. त्यांनी त्या गोष्टी शिकून घेऊन तळमळीने सेवा केली. त्यांच्यातील तळमळ आणि भाव सगळ्यांनी शिकण्यासारखा आहे. श्री. परशुराम पाटील यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
१. ‘अँड्राईड’ भ्रमणभाष शिकून घेऊन सेवा करणे
१ अ. ‘अँड्राईड’ भ्रमणभाष हाताळता येत नसणे, शिकलेले विसरायला होणे, पुनःपुन्हा त्या गोष्टी विचारल्यावर मुलगा रागवत असूनही चिकाटीने भ्रमणभाष शिकून घेणे : ‘दळणवळण बंदीपासून सनातन संस्थेच्या अनेक सेवा आणि सत्संग ‘ऑनलाईन’ होतात. त्यासाठी वापरावा लागणारा ‘अँॅड्राईड’ भ्रमणभाष कसा हाताळायचा ?’, ते माझ्या पत्नीला यायचे नाही. ती सातत्याने आमचा धाकटा मुलगा ‘ओम्’ याला ‘मला भ्रमणभाष शिकव’, असे सांगायची. तिला भ्रमणभाष वापरण्याचा सराव नसल्यामुळे काही वेळा ती त्याने शिकवलेले विसरून जायची. तिला सारखे सांगावे लागले की, मुलगा तिला ‘मी आता सांगणार नाही’, असे म्हणायचा; पण ती परत चिकाटीने त्याच्या मागे लागून शिकायची. तेव्हा तिचा ‘मुलगा आपल्यावर चिडतो किंवा रागावतो’, असा विचार नसायचा. ‘साधकच आपल्याला शिकवत आहेत’, असा विचार करून ती सगळे विसरून परत त्याच्याकडून भ्रमणभाष शिकायची.
१ आ. ‘अँड्राईड’ भ्रमणभाष हाताळायला शिकल्यावर पत्नी तिला सांगितलेली प्रत्येक सेवा स्वीकारून त्या सेवा करून वेळेत पाठवत असणे : तिला भ्रमणभाषवरील सेवांचा काहीच अनुभव नव्हता, तरीही तिने भ्रमणभाषमधील आवश्यक ते सगळे चिकाटीने शिकून घेतले आणि सगळे अहवाल अन् आढावे वेळेत देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उत्तरदायी साधकांना तिच्याविषयी विश्वास वाटून त्यांनी तिला अजून काही सेवांचे दायित्व दिले. उत्तरदायी साधकांना तिने केलेल्या सेवांचे कौतुक वाटायचे.
१ इ. मुलाचा अभ्यास आणि पत्नीच्या सेवांचे दायित्व वाढत गेले, तसे पत्नीला वेळ द्यायला मुलाने नकार देणे, त्याला ‘आईला साहाय्य करणे’, ही त्याची साधनाच आहे’, असे समजावल्यावर तो तिला सेवांत साहाय्य करू लागणे : काही कालावधीने पत्नीच्या सेवांचे दायित्व वाढले आणि मुलाचा अभ्यासही वाढला. त्यामुळे तो तिला साहाय्य करायला सिद्ध नसायचा. तेव्हा पत्नीने मला भ्रमणभाष करून ही अडचण सांगितली. मी मुलाला ‘आईला सर्व सेवांत साहाय्य करणे, ही तुझी साधनाच आहे’, असे समजावले. मग तोही आईला घरातील आणि इतर सेवांत साहाय्य करू लागला. अशा प्रकारे देवाच्या कृपेने त्यांचे एकमेकांना समजून घेऊन साधना करण्याचे प्रयत्न वाढले.
२. आरंभी पत्नीला दूरदर्शनवरील मालिका पहायला आवडणे, सेवा चालू झाल्यावर पत्नीचे दूरदर्शन पहाणे बंद होऊन तिला सेवांतूनच आनंद मिळणे
पत्नीला आरंभी दूरदर्शनवरील मालिका बघण्याची फार आवड होती. ती दूरदर्शनवरील मालिका संपल्यावरच घरातील कामे करायची. सेवा आणि साधकांचे समन्वय वाढल्यामुळे तिचे मालिका बघणे हळूहळू न्यून होत कधी बंद झाले, ते तिला समजलेच नाही. ती सेवेत पुष्कळ आनंदी असायची. आता ती पूर्ण दिवस सेवेतील आनंद घेऊ लागली आहे. (क्रमशः)
– श्री. परशुराम पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|