स्वस्त धान्य दुकानातील ३ लाख रुपयांचा तांदूळ अन्यत्र विक्रीसाठी नेणाऱ्या वजीर मुजावरला अटक !
निपाणी (कर्नाटक) – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी येथे स्वस्त धान्य दुकानातील ३ लाख रुपयांचा तांदूळ (१४ टन) कोल्हापूर येथील बाजारपेठेत अधिक दराने विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकचालक वजीर नजीर मुजावरला बसवेश्वर चौक पोलिसांनी अटक केली आहे. संशयित ट्रकचालक वजीर मुजावर हा त्याच्या ट्रकमधून स्वस्त दुकानातील तांदूळ कोल्हापूर येथे अधिक दराने विक्रीसाठी घेऊन जात होता, अशी माहिती तालुका आहार विभागाला मिळाली. त्यानंतर आहार विभागाने कारवाई करून वजीर मुजावर याच्या विरोधात तक्रार दिली होती.
संपादकीय भूमिकासुविधा मिळवण्यात अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |