नियम मोडून गैरवर्तन करणाऱ्या २ धर्मांधांना अटक !
|
कल्याण – येथील बैलबाजार परिसरातील हिंद पेट्रोलपंपावर १५ एप्रिलला दुपारी २ वाजता मुकलीस मोहसीन फक्की, जावेद असमत डॉन हे दोघे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आले होते. तेथील कामगाराने त्यांना रांगेत येण्यास सांगितल्यावर त्यांनी त्याला मारहाण केली आणि पेट्रोल ओतणाऱ्या पाईपचा ‘नोझल’ खेचला. इतर चालकांनी प्रसंगावधान राखून दोन्ही तरुणांना तेथून बाहेर काढले, अन्यथा ‘नोझल’ तुटून पेट्रोल इतस्ततः पसरले असते आणि अनर्थ झाला असता. (सतर्क चालकांचे अभिनंदन ! – संपादक) या प्रकरणी पेट्रोल पंपाचे मालक शैलेश काकराणी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोन्ही तरुणांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकासमाजामध्ये सर्वत्र असणाऱ्या नियमांचे पालन न करता उद्दामपणा करणारे धर्मांध ! |