सनातनचा साधक कु. अथर्व दिनकर पाटील ‘अभिरूप’ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम !
सातारा, १६ एप्रिल (वार्ता.) – ‘विद्यार्थी विकास फाऊंडेशन’द्वारा आयोजित ‘भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती राज्यस्तरीय परीक्षा-२०२३’ या परीक्षेत रहिमतपूर (रघुनाथपूर) (जिल्हा सातारा) येथील सनातनचा साधक कु. अथर्व दिनकर पाटील याने ३०० गुणांपैकी २६४ गुण मिळवत राज्यस्तरीय गुणवत्ता सूचीत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. कु. अथर्व हा वसंतदादा पाटील विद्यालय रहिमतपूर येथील इयत्ता ८ वीमध्ये शिकत असून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतो. त्याचे वडील श्री. दिनकर पाटील हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतात, तसेच प्रासंगिक सेवेतही सहभागी असतात. चि. अथर्वने हे यश गुरुमाऊलींच्याच कृपेमुळे म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याच कृपेमुळेच मिळाले आहे, असे सांगून गुरमाऊलींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त केली आहे.