प्रवेशद्वारावरील नाव मराठीत असण्यासाठी विश्व हिंदु परिषदेचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण !
मंगरूळनाथ (जिल्हा वाशीम) येथील नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर उर्दू भाषेत नाव लिहिल्याचे प्रकरण
मंगरूळनाथ (जिल्हा वाशीम), १६ एप्रिल (वार्ता.) – येथील नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरील नाव उर्दू भाषेत लिहिलेले आहे. १० फेब्रुवारी २०२३ या दिवशी नगरपालिकेचे प्रशासक मा. उपविभागीय अधिकारी यांनी उर्दू भाषेतील ठराव रहित करून ‘मराठी भाषेतच लिखाण करावे’, असा नवीन ठराव केला होता; मात्र अजूनपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही. (ठराव संमत होऊन २ मास झाले, तरी त्याची कार्यवाही न करण्याला उत्तरदायी असणाऱ्यांना खडसवा ! – संपादक)
विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी ‘कार्यालयाचे नाव राजभाषा मराठीतच असावे’, यासाठी १२ एप्रिलपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण चालू केले आहे. विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री सतीश हिवरकर यांनी मराठी भाषेत नाव न पालटल्यास आणि उपोषणकर्त्यांच्या जीवितास धोका झाल्यास संपूर्ण विदर्भ प्रांतात आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. (आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर उर्दू भाषेत नाव लिहायला हा भारत आहे कि पाक ? |