सततच्या पंख्याच्या वार्याने होऊ शकणारे त्रास
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १८१
‘सध्या पुष्कळ उकाडा होत असल्याने अनेक जण रात्री पूर्ण गतीने पंखा लावून झोपतात. रात्री झोपेत ६ ते ८ घंटे पंख्याचे जोराचे वारे अंगावर येत असतात. या सततच्या मोठ्या वार्यामुळे शरिरात कोरडेपणा निर्माण होतो. यामुळे अनेकांना खोकला चालू होतो. सकाळी उठल्यावर काहींचे अंग आखडते. काहींना सकाळी उठल्यावर थकवा येतो. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास ती सततच्या पंख्यामुळे असू शकतात, हे लक्षात घेऊन रात्री जेव्हा जाग येते, तेव्हा पंख्याची गती न्यून करावी. शक्य असल्यास फिरता ‘टेबल फॅन’ वापरावा. हा फिरता असल्याने सतत अंगावर वारा येत नाही. आजकाल काही पंख्यांना ठराविक कालावधीने गती न्यून करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या सोयीचाही वापर करून घेता येऊ शकतो.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२३)
आतापर्यंतचे सर्व लेख वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकवर क्लिक करा ! |