बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे अध्यात्मातील विविध अंगांना मुकणारे हिंदू !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
पूर्वीच्या काळी ‘बुद्धीला पटते, तेच खरे’, अशा वृत्तीचा समाज आणि अधिवक्ते इत्यादी नसल्याने ‘मारुती एका उड्डाणात श्रीलंकेला पोहोचला’, अशासारख्या रामायणातील, तसेच महाभारतातील आणि विविध पुराणांतील ऐतिहासिक कथा, त्याचप्रमाणे ‘ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले’ इत्यादी इतिहास सांगणार्यांना शिक्षा केली गेली नाही. आता ‘बुद्धीपलीकडील काही अनुभवले, तर ते छापू नका’, असा अधिवक्त्यांचा सल्ला सर्वांना असतो ! त्यामुळे मानवाला फार मोठ्या घटना आणि त्यांचे शास्त्र यांपासून वंचित रहावे लागत आहे. हिंदु राष्ट्रात बुद्धीपलीकडील सांगणार्यांचा गौरव केला जाईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले