आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काकांना अटक

स्वतःचा भाऊ आणि माजी खासदार यांची केली होती हत्या !

वाय.एस्. भास्कर रेड्डी

अमरावती (आंध्रप्रदेश) – माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येच्या प्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका वाय.एस्. भास्कर रेड्डी यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) अटक केली. विशेष म्हणजे विवेकानंद रेड्डी हे भास्कर रेड्डी यांचे भाऊच होते. ते पुलीवेंदुला भागातील त्यांच्या घरामध्ये १५ मार्च २०१९ या दिवशी मृत अवस्थेत सापडले होते.

सीबीआयाच्या आरोपपत्रानुसार विवेकानंद रेड्डी हे कडप्पा लोकसभा मतदारसंघासाठी जगन मोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला किंवा जगन मोहन रेड्डी यांची आई वाय.एस्. विजयम्मा यांना उमेदवारी देण्याची मागणी करत होते. या मतदारसंघात भास्कर रेड्डी यांचा मुलगा अविनाश रेड्डी खासदार आहे.