मुंबईत ३ आतंकवादी घुसल्याची खोटी माहिती देणार्या धर्मांधाला नगर येथून अटक !
महाराष्ट्र ए.टी.एस्.ची कारवाई
नगर – मुंबईत ३ आतंकवादी घुसल्याची खोटी माहिती पोलिसांना देणार्या यासिन सय्यद याला महाराष्ट्र आतंकवाद विरोधी पथकाने नगरमधून अटक केली आहे. त्याच्याकडे कसून चौकशी करून खोटी माहिती देण्याचे कारण विचारले असता आरोपीचा चुलत भाऊ मुजीब सय्यद आणि आरोपी यासीन सय्यद यांचा भवानीनगर येथे साडेपाच गुंठ्याचा वडीलोपार्जित सामाईक प्लॉट असून त्या प्लॉटच्या वादावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मुजीब आणि त्याच्या कुटुंबियांना पोलिसांकडून त्रास व्हावा, या उद्देशाने खोटी माहिती देऊन हा गुन्हा केल्याचे यासिन याने मान्य केले आहे. पोलिसांना खोटी माहिती देऊन यासिन सय्यद याने मुजीब सय्यदचे नाव या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित आरोपीस कह्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्याला उपस्थित केले आहे.
संपादकीय भूमिकाप्रथम खोटी माहिती देऊन एक दिवस खरोखरच आतंकवाद्यांना घुसण्यासाठी साहाय्य करायलाही हे धर्मांध मागे-पुढे पहाणार नाहीत. त्यामुळे अशा धर्मांधांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! |