विवेक सभेत डॉ. उदय निरगुडकर यांचे कालातीत स्वातंत्र्यवीर सावरकर यावर व्याख्यान !
सांगली – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री शिवछत्रपतींना मासिक श्रद्धांजली वहाण्यासाठी विवेक सभा आयोजित केली जाते. या विवेक सभेत रविवार, १६ एप्रिलला ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे कालातीत स्वातंत्र्यवीर सावरकर यावर सायंकाळी ६.३० सिटी हायस्कूल येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.