तुळजापुरातील मदरसा आणि मुसलमान स्मशानभूमी येथे चालू असलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे !
शिवबाराजे प्रतिष्ठानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील जिजामातानगर मदरसा आणि वेताळनगर येथील मुसलमान स्मशानभूमी येथे चालू असलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवून झालेले बांधकाम हटवण्यात यावे, या मागणीचे निवेदन ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही ठिकाणी चालू असलेल्या बांधकामास स्थानिक स्तरावर विरोध असूनही बांधकाम चालू आहे. या बांधकामामुळे भविष्यात तुळजापूर शहरातील शांतता भंग होऊन धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिजामातानगर येथील मदरशाच्या ठिकाणी आणि वेताळनगर येथील मुसलमान स्मशानभूमी येथे चालू असलेले बांधकाम तात्काळ थांबवून ते हटवण्यात यावे.
संपादकीय भूमिका
|