मिरज येथील श्री संत वेणास्वामी पुण्यस्मरण महोत्सवास प्रारंभ !
मिरज, १५ एप्रिल (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे श्री संत वेणास्वामी पुण्यस्मरण महोत्सवास ८ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. हा महोत्सव १९ एप्रिलपर्यंत चालणार आहे. १३ ते १९ एप्रिल या काळात दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ या वेळेत कीर्तन सेवा मठातील पीठस्त देवतांच्या समोर होत आहे. १९ एप्रिल या दिवशी पू. कौस्तुभबुवा रामदासी यांचे संत वेणास्वामी महानिर्याण कीर्तन होईल. हे सर्व कार्यक्रम ब्राह्मणपुरी येथील श्री संत वेणास्वामी मठ येथे होत आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी केले आहे.