देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या !
नवी देहली – येथील भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेंद्र मतियाला (वय ६० वर्षे) यांची त्यांच्या देहलीतील कार्यालयात घुसून आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना १४ एप्रिलला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी बिंदापूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून गोळीबार करणार्यांचा शोध चालू केला आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र मतियाला हे त्यांचे एक नातेवाईक आणि कार्यालयातील कर्मचारी यांच्यासमवेत कार्यालयात बसले होते. या वेळी दोन जणांनी कार्यालयाचा दरवाजा उघडला आणि सुरेद्र मतियाला यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. सुरेंद्र मतियाला यांना ५ गोळ्या लागल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांसह सर्व पोलीस अधिकारी घटनास्थळी पोचले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
दिल्ली के नजफ़गढ़ इलाके में बीजेपी के पूर्व निगम पार्षद सुरेंद्र मटियाला की हत्या…
दो बदमाशों ने शुक्रवार की शाम दफ़्तर में घुसकर मारी 6 गोली और बाइक से हुए फ़रार…#bjpdelhi #bjpFormercouncilor #SurenderMatiala pic.twitter.com/j647aqsmhZ
— India TV (@indiatvnews) April 15, 2023
सुरेंद्र मतियाला हे भाजपच्या नजफगड जिल्ह्याचे किसान मोर्चाचे प्रभारी होते. सुरेंद्र मतियाला यांच्या हत्येच्या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका
|