उद्दाम चारचाकी वाहनचालकाने वाहतूक पोलिसाला ‘बोनेट’ला लटकलेल्या अवस्थेत १ किलोमीटर नेले !
भ्रमणभाषवर बोलतांना हटकले : वाहन थांबवायला सागणार्या पोलिसालाच धडक
(‘बोनेट’ म्हणजे कारच्या पुढील भाग)
लुधियाना (पंजाब) – येथे एका चारचाकी वाहनचालकाने वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून काही अंतर फरफटत नेऊन खाली पाडल्याची घटना घडली. या वाहतूक पोलिसाने या वाहनचालकाला वाहन चालवतांना भ्रणभषणवर बोलण्यास मनाई केली होती. याचा वाहनचालकाला राग आल आणि त्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. ही घटना माता राणी चौकात घडली. हरदीप सिंह असे या पोलिसाचे नाव आहे.
लुधियाना में दिल्ली के कंझावला जैसा कांड, कार की बोनट पर पुलिसकर्मी को एक किमी तक घसीटा#Punjab #Ludhiana #Crime https://t.co/yHuWGfUBqS
— ABP News (@ABPNews) April 14, 2023
हरदीप सिंह यांनी घंटाघर चौकाकडून येणार्या वाहनाच्या चालकाला भ्रमणभाषवर बोलतांना पाहून त्याला थांबण्याची सूचना केली; मात्र वाहनचालकाने वाहन थांबवण्याऐवजी गाडी पळवू लागल्यावर हरदीप यांनी गाडीच्या बोनेटवर उडी मारली. गाडी थांबण्याऐवजी सदर वाहनचालकाने सिंह यांना जवळपास १ किलोमीटर असेच फरफटत नेले आणि नंतर खाली पाडून पळून गेला. या घटनेत हरदीप सिंह घायाळ झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरोपीचे नाव मुकल मोंटू असून तो मोहल्ला फतेहगड येथील रहिवासी आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकायावरून अशा प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांचा जराही धाक नाही, हे स्पष्ट होते ! अशा कायदाद्रोही वाहनचालकांना कठोर शिक्षा झाली, तरच इतरांवर वचक बसेल ! |