पाकिस्तानमध्ये पवित्र गुरुद्वाराच्या दर्शनासाठी गेलेल्या भारतियांना खलिस्तानी आतंकवाद्याने खलिस्तानसाठी चिथावले !
(म्हणे) ‘शिखांसाठी स्वतंत्र देश हवा !’
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये असलेल्या शिखांच्या पवित्र गुरुद्वारा श्री पंजा साहिबमध्ये पाकिस्तानमध्ये रहाणारा खलिस्तानी आतंकवादी गोपाल सिंह चावला याने येथे दर्शनासाठी आलेल्या भारतीय शिखांसमोर भाषण करत त्यांना खलिस्तानसाठी चिथावले. ‘शिखांसाठी स्वतंत्र देश हवा’, असे चिथावणीखोर आवाहन त्याने केले. त्याने उपस्थितांना ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास भाग पाडले.
बैसाखी पर पाकिस्तान में लगे खालिस्तानी नारे: भारत के श्रद्धालुओं से बोला आतंकी चावला- सिखों के लिए अलग देश बने#Punjab #amritsar #baisakhifestival https://t.co/ytPnHWNa3d pic.twitter.com/DeVloFZjcL
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) April 15, 2023
‘पाकिस्तान शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती’ आणि ‘इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ यांच्याकडून या गुरुद्वारामध्ये बैसाखीनिमित्त (शिखांचा एक सण) एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गोपाल सिंह चावला म्हणाला की, आम्ही शिरोमणी समितीत आहोत, तरीही आम्ही शीख आहोत. आम्ही देहली समितीत आहोत, तरीही आम्ही शीख आहोत. आम्ही उघडपणे आवाज उठवू शकत नाही; पण तरीही आम्ही शीख आहोत. आमचा स्वतःचा देश असावा, अशी आमची मनापासून इच्छा आहे. जो कोणी गुरूचा शीख आहे, तो माझ्या ‘खलिस्तान झिंंदाबाद’ या घोषणेत सहभागी होईल.’