बेळगाव येथील सुश्री शोभा मिर्जी (वय ६५ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
बेळगाव येथील सुश्री शोभा मिर्जी (वय ६५ वर्षे) या निवृत्त शिक्षिका असून त्या सनातनच्या साधना संवादातील एका ऑनलाईन सत्संगात सहभागी होतात. त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सत्संगात सहभागी होण्याची तळमळ : सुश्री शोभा मिर्जी यांना ऑनलाईन सत्संगात सहभागी होण्याची पुष्कळ तळमळ असते. त्या सत्संगाच्या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतात. सत्संग चालू होण्यापूर्वीच त्यांना पुष्कळ आनंद होत असतो.
२. सत्संगात शिकवल्याप्रमाणे व्यष्टी साधनेची सूत्रे पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो.
३. सत्संगात काही समजले नसल्यास त्या पुन्हा विचारतात आणि त्यानुसार प्रयत्न करतात.
४. सत्संगात शिकायला मिळाल्याप्रमाणे कृती करणे : सत्संगामध्ये धर्मदान अभियानाविषयी आणि धनाच्या त्यागाचे महत्त्व सांगितल्यानंतर त्यांना तो विषय पुष्कळ आवडला आणि त्यांनी धर्मदान करायचे ठरवले. त्यानंतर त्यांना याविषयी अनुभूती आली.
– सौ. ज्योत्स्ना नारकर (वय ६१ वर्षे), पडेल, देवगड, सिंधुदुर्ग. (२८.१.२०२३)
सनातन संस्थेला अर्पण देतांना आज्ञाचक्रावर संवेदना जाणवून आनंद होणे आणि पूर्वीपेक्षा नामस्मरणाची रुची वाढणे१. मकर संक्रांत ते रथसप्तमी या शुभपर्वामध्ये अर्पण करण्याचे ठरवणेसत्संगात सांगितलेले मकर संक्रांत ते रथसप्तमी या शुभपर्वामध्ये अर्पण केल्याने शुभ फळ प्राप्त होते, हे विचार माझ्या मनाला पुष्कळ आवडले. त्याप्रमाणे मी बेळगावच्या सनातनच्या साधिका सौ. अरुणा कायस्थकाकू (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६८ वर्षे) यांना मला अर्पण करायचे असल्याचे सांगितले. दुसर्या दिवशीच त्या श्री. श्रीकांत देशपांडेकाका (वय ६३ वर्षे) आणि सौ. नीता रेवणकरताई यांच्या समवेत माझ्या घरी आल्या. २. अधिकोषातून पैसे काढून घरी येईपर्यंत आज्ञाचक्रावर संवेदना जाणवणे आणि तेव्हा आनंद होणेमी अर्पण करण्यासाठी पैसे काढण्यासाठी अधिकोषात गेले. माझ्या अधिकोषातील खात्यामध्ये आवश्यक तेवढे पैसे भरण्यासाठी अर्ज लिहितांना गुरूंच्या कृपेने माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवत होत्या. त्या संवेदना मी घरी येईपर्यंत चालू होत्या. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. ३. साधक अर्पणाचा अर्ज भरत असतांना पुन्हा आज्ञाचक्रावर संवेदना जाणवणेत्यानंतर सनातनचे साधक माझ्या घरी आल्यावर मी त्यांना मला आलेली अनुभूती सांगितली. तेव्हा त्यांनाही पुष्कळ आनंद झाला. सनातनचे साधक अर्पणाचा अर्ज भरत असतांना मला पुन्हा माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवल्या. तेव्हा मला गुरुकृपा अनुभवता येत असल्याविषयी साधकांना पुष्कळ आनंद झाला. ४. जाणवलेले पालटअ. मला सतत हसतच रहावे, असे वाटते. आ. पूर्वीपेक्षा मला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शक्तीशाली वाटते. इ. आता माझी नामस्मरणामधील रुची वाढत चालली आहे. गुरुदेवांच्या चरणी अनंत, अनंत नमस्कार आणि कृतज्ञता व्यक्त करते. – सुश्री शोभा मिर्जी (वय ६५ वर्षे), बेळगाव, कर्नाटक. (२१.१.२०२३) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |