मन प्रसन्न करणारे वाळ्याचे सुगंधी पाणी
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १८०
उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे भरपूर घाम येऊन शरिरातील पाणी न्यून होते. त्यामुळे या दिवसांत पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या १ लिटर पाण्यामागे १ चहाचा चमचा या प्रमाणात सनातन उशीर (वाळा) चूर्ण पाण्यात घालून ठेवावे. तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यावे. यामुळे मन प्रसन्न रहाण्यास, तसेच उष्णतेमुळे होणारे त्रास न्यून होण्यास साहाय्य होते.
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२३)
आतापर्यंतचे सर्व लेख वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकवर क्लिक करा ! |