हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कतरास (झारखंड) अन् हावडा (बंगाल) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मंदिरांमध्ये साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियान
धनबाद (झारखंड) – हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्वास्थ्य चांगले रहावे, यासाठी कतरासमधील (झारखंड) संकटमोचन मंदिर, सूर्य मंदिर आणि हनुमान मंदिर, तसेच हावडा (बंगाल) येथील चॅटर्जी हाट येथील बोरो मां सेवालय मंदिर या सर्व ठिकाणी देवतांना साकडे घालण्यासह हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली. यासमवेतच तेथे उपस्थित असलेले धर्मप्रेमी आणि भाविक यांच्याकडून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीची प्रतिज्ञा करण्यात आली. कतरास येथे साकडे घालण्याच्या वेळी सनातन संस्थेचे पू. प्रदीप खेमका यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या उपक्रमांमध्ये धर्मप्रेमी, भाविक, पुजारी आणि मंदिरांचे विश्वस्त यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.