चंद्रपूर जिल्हाधिकार्यांचा मद्याची दुकाने बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयाकडून रहित !
आंबेडकर जयंतीदिनी मद्याची दुकाने चालूच !
चंद्रपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल या दिवशी जिल्ह्यातील मद्याची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी लागू केले होते. या आदेशाविरोधात चंद्रपूर लिकर असोसिएशनचे अध्यक्ष राजू मारकवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट करून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला आव्हान दिले. त्यानंतर उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि एम्.डब्ल्यू. चांदवाणी यांच्या खंडपिठाने आदेशाला स्थगिती देत आदेश रहित ठरवला आहे. त्यामुळे १४ एप्रिल या दिवशी जिल्ह्यात मद्याची दुकाने चालू होती.
श्रीरामनवमी महोत्सव तथा सागवान लाकूड शोभायात्रादिनी चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरांतील देशी-विदेशी मद्यांची दुकाने बंद होती; मात्र आंबेडकर जयंतीला दुकाने चालू असल्याने नागरिकांकडून टीका केली जात आहे.
संपादकीय भूमिका
|