वेद आणि पुराणे यांचा अभ्यास केल्याचे वेगळे श्रेयांक गुण दिले जाणार ! – विद्यापीठ अनुदान आयोग
नवी देहली – विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क’चे प्रारूप घोषित केले आहे. त्यात ‘श्रेयांक पद्धती’विषयी (‘क्रेडिट सिस्टीम’विषयी ) काही नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांत विद्यार्थ्यांना वेद, पुराणे, मीमांसा, धर्मशास्त्र, ज्योतिष, वेदांग इत्यादी भारतीय ज्ञान परंपरांच्या विविध शाखांचा अभ्यास केल्यास वेगळे श्रेयांक गुण दिले जाणार आहेत. भारतीय ज्ञान परंपरेतील १४ विद्या, ६४ कला यांचा उल्लेख यात करण्यात आला आहे. त्याखेरीज विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केल्यास त्यांनाही श्रेयांक गुण दिले जाणार आहेत.
सौजन्य : CNN-News18