हाजीपूर (बिहार) येथे सनातन संस्थेच्या वतीने आनंदी जीवनासाठी अध्यात्म विषयावर प्रवचन पार पडले !
पाटलीपुत्र (बिहार) – पाटलीपुत्र जिल्ह्यातील सारणच्या हाजीपूर येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म विषयावर प्रवचन घेण्यात आले. हे प्रवचन सनातन संस्थेच्या साधिका सौ. सानिका सिंह यांनी घेतले. या वेळी कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व सांगण्यात आले.