राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी क्षमा मागावी ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे प्रकरण
मुंबई – राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी क्षमा मागावी, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, अशी चेतावणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांना दिली आहे. ते म्हणाले, ‘‘राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पाच वेळा अपमान केला. आताही त्यांची भूमिका पालटलेली नाही आणि त्यांनी क्षमाही मागितली नाही.’’