पी.एफ्.आय.वर बंदी घातल्यावर अटक केलेल्या ८ कार्यकर्त्यांची सुटका !
बेंगळुरू (कर्नाटक) – पी.एफ्.आय. या जिहादी संघटनेवर बंदी घातल्यावर अटक केलेल्या ८ कार्यकर्त्यांना बेंगळुरू नगर दिवाणी न्यायालयाने जामीन संमत केला आहे. गेल्या वर्षी २२ सप्टेंबरला संपूर्ण देशात पी.एफ्.आय.ची कार्यालये, प्रमुख पदाधिकारी यांची घरे यांवर धाड टाकून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने, तसेच स्थानिक पोलिसांनी अनेकांना अटक केली होती.