हलाल प्रमाणपत्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे संकट ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
मुझफ्फरपूर (बिहार) – हलाल प्रमाणपत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे संकट असून बहुतांश लोकांना या संकटाविषयी माहितीही नाही. त्यामुळे प्रत्येकाने याचा वैध मार्गाने विरोध केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुझफ्फरपूर येथील पोलीस लाईनमधील श्रीराम जानकी मंदिर, बरूराज येथील मंदिर, समस्तीपूरचे नागरबस्ती, आणि सारणचे हाजीपूर अशा विविध ठिकाणी आयोजित हलालमुक्त अभियानाच्या अंतर्गत झालेल्या कार्यक्रमांमध्ये ते मार्गदर्शन करत होते.