(म्हणे) ‘सत्तेचा गैरवापर करून भारतियांमध्ये फूट पाडणारे खरे ‘देशद्रोही’ !’ – सोनिया गांधी
नवी देहली – सत्तेचा गैरवापर करून भारतियांमध्ये भाषा, जात, लिंग आणि धर्म यांच्या आधारावर फूट पाडणारे खरे ‘देशद्रोही’ आहेत, असे काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका लेखामध्ये त्यांनी हे विधान केले आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या,
१. ‘राज्यकारभाराची धुरा सांभाळणार्यांच्या वर्तनावर राज्यघटनेचे यश अवलंबून असते’, बाबासाहेबांची दूरदर्शी चेतावणी आपण लक्षात ठेवली पाहिजे. आज सरकार घटनात्मक संस्थांचा गैरवापर करून त्या नष्ट करत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचा पाया ढासळत चालला आहे.
२. बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या भाषणात जातीव्यवस्था बंधुभावाच्या मुळावर कशी आघात करते, यावर सविस्तर सांगितले. त्यांनी त्याला ‘देशद्रोही’ म्हटले कारण ती परकेपणा, मत्सर, द्वेष निर्माण करते आणि भारतियांना एकमेकांविरुद्ध विभाजित करते. (म्हणूनच बाबासाहेबांनी ‘आरक्षण १० वर्षांत संपुष्टात आणा’, असे सांगितले होते, तरी देशात सुमारे ५० वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी जातीवर आधारित आरक्षण आणि इतर सुविधा चालू ठेवून जातीव्यवस्थेला खतपाणी का घातले, याचे उत्तर सोनिया गांधी यांनी भारतियांना दिले पाहिजे ! – संपादक)
“Today, the regime in power is misusing and subverting the institutions of the Constitution, and weakening its foundations of liberty, equality, fraternity and justice.”
Smt. Sonia Gandhi, Chairperson of the Congress Parliamentary Party, pays tribute to Dr. B.R. Ambedkar. pic.twitter.com/PgTUunvoLD
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 14, 2023
संपादकीय भूमिका
|