टेक्सास (अमेरिका) येथील डेअरी फार्ममध्ये झालेल्या स्फोटामुळे १८ सहस्र गायींचा मृत्यू !
टेक्सास (अमेरिका) – टेक्सास राज्यातील डिमिट शहरातील साऊथ फोर्क डेअरी फार्ममध्येे स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत १८ सहस्र गायींचा मृत्यू झाला. डेअरीमध्ये यंत्रसामग्रीच्या बिघाडामुळे हा स्फोट झाला. यामुळे तेथे आग लागली. या अपघातात एक जण गंभीररित्या घायाळही झाला आहे. या वेळी काही गायींना वाचवण्यातही यश आले आहे. साऊथ फोर्क डेअरी फार्म ही टेक्सासमधील सर्वांत मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन करणारे आस्थापन आहे. येथे जवळपास ३० सहस्र गायी आहेत.
अमेरिका के एक राज्य में डेयरी फार्म पर हुए भयंकर विस्फोट से हजारों गायों की जान चली गई.#America #SouthforkDairyFarms #Texas https://t.co/I7ZN0Sxp9N
— ABP News (@ABPNews) April 14, 2023
पोलीस अधिकारी साल रिवेरा म्हणाले की, यंत्र अधिक गरम झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा आम्हाला संशय आहे. यंत्र गरम झाल्याने त्यातून मिथेन वायू बाहेर पडू लागला. यामुळे स्फोट झाला असावा आणि गायींच्या चार्याला आग लागली असावी. स्फोट झाला, तेव्हा दूध काढण्यासाठी गायींना गोठ्यात बांधले होते.