पाकिस्तानमध्ये वृत्तवाहिनीच्या हिंदु अधिकार्याचे अपहरण !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘बोल न्यूज’चे अधिकारी आकाश राम यांचे ११ एप्रिल या दिवशी घरासमोरून अपहरण करण्यात आले. एक चारचाकी गाडीतून त्यांचे आणि त्यांच्या सुरक्षारक्षक यांचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी येथील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून टाकला. आकाश राम यांच्या आईने म्हटले, ‘माझा मुलगा हिंदु आहे; मात्र तो पाकिस्तानीही आहे, मग त्याचे अपहरण का करण्यात आले ? मी त्याला पाहू इच्छित आहे.’
#Pakistan‘s Leading News Channel #BOLNews Marketing Head Akash Ram (Hindu) was abducted outside of his residence in the wee hours on Tuesday.the marketing head was abducted through a silver vehicle that was also often seen taking rounds outside #BOL ، Akash’s mother’s appeal👇 pic.twitter.com/KrvrKqLG0B
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) April 12, 2023
संपादकीय भूमिकापाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित आहेत, हे जगजाहीर असतांना त्यांच्या संरक्षणासाठी पाक सरकार, प्रशासन, पोलीस काहीच करणार नाहीत, हे सत्य आहे; मात्र जागतिक देश, संघटना आणि भारतही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद ! |