सिंधुदुर्ग : टेम्पोवर ‘छत्रपती’ लिहून गोवंशियांची अवैध वाहतूक करणारे ३ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
१० गोवंशीय आणि २ म्हशी यांची सुटका
कणकवली – गोवंशियांना अमानुषपणे कोंबून त्यांना हत्येसाठी घेऊन जात असलेल्या टेम्पोवर पोलिसांनी कारवाई करून चालक आसिफ महंमद इसाक सिराज (आजरा, कोल्हापूर), गाडीचा मालक उस्मान उपाख्य ताहीर मुनाफ जमादार (नेसरी, गडहिंग्लज) आणि चालकाचा साहाय्यक हुजेफा शकील सिराज (आजरा) यांना अटक केली. या वेळी पोलिसांनी टेम्पोतून १० गोवंशीय आणि २ म्हशी यांची सुटका केली. या प्रकरणी गुन्हा नोंद करून पोलिसांनी गुरांना कुडाळ तालुक्यातील सरसोलीधाम, सरंबळ येथील गोशाळेत पाठवले आहे.
हा टेम्पो १२ एप्रिलला उत्तररात्री ३ वाजता फोंडाघाट पोलीस तपासणीनाक्यावर पोलिसांनी पकडला. या टेम्पोच्या काचेवर ‘छत्रपती’, असे भगव्या रंगात आणि मराठी भाषेत लिहिले आहे. हा टेम्पो या मार्गावरून जात असतांना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तो तपासणीसाठी थांबवला. या वेळी टेम्पोतून गोवंशीय आणि म्हशी यांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली.