रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !
सौ. पूजा सुनील कुमार चौहान, कांगरा, हिमाचल प्रदेश.
१. ‘दैनंदिन जीवनाचे अध्यात्मीकरण कसे करायचे ?’, याविषयी ज्ञान मिळाले : ‘आश्रमात आल्यानंतर मला ईश्वरप्राप्तीच्या संदर्भात जाणून घेण्याचे सौभाग्य लाभले. ‘आपल्या दैनंदिन जीवनाचे अध्यात्मीकरण कसे करायचे ?’, याविषयी ज्ञान मिळाले. मला हे सर्व समजल्यावर पुष्कळ चांगले वाटले. आम्हाला या आश्रमात येण्याचे सौभाग्य लाभले आणि अध्यात्माविषयी माहिती मिळाली, त्याबद्दल आम्ही आश्रमातील सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो.’