सौ. श्रावणी फाटक यांनी त्यांचे मोठे भाऊ श्री. ‘अभय विजय वर्तक’ यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून केलेली कविता
चैत्र कृष्ण नवमी (१४.४.२०२३) या दिवशी श्री. अभय वर्तक यांचा ४८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची बहीण सौ. श्रावणी फाटक यांनी ‘अभय विजय वर्तक’ या नावाच्या आद्याक्षरावरून केलेली कविता पुढे दिली आहे.
श्री. अभय वर्तक यांना ४८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
अ – अविरत श्रमाने करी विविध प्रांती भ्रमण ।
व्रत हे घेतले शिरी करण्या धर्मरक्षण ।। १ ।।
भ – भयमुक्त हा, याला भय ना वाटे मुळी ।
ईश्वरेच्छेने वागे सार्या प्रसंगी त्या त्या वेळी ।। २ ।।
य – यत्नपूर्वक अन् श्रद्धेने करतसे क्षात्रधर्म साधना ।
गुरुकृपेने संमिलित होती संप्रदायही नाना ।। ३ ।।
वि – विजयश्री खेचून आणतील श्रद्धेने साधक सारे ।
हिंदुस्थानी या अखंड वहातील हिंदुत्वाचे वारे ।। ४ ।।
ज – जयमाला ही गळ्यात पडेल, जे श्रीविष्णु अवतारी ।
‘भक्त सारे भक्तीने मिळवतील’, श्रद्धा ही न्यारी ।। ५ ।।
य – यत्न त्यांचा, परि पडद्यामागे श्री गुरूंचा संकल्प ।
जो तो काठी लावी उचले भार, अधिक वा अल्प ।। ६ ।।
व – वरदहस्त लाभे या राष्ट्रकार्यास ईश्वराचा ।
हातभार लागे आणिक हितचिंतक अन् साधूसंत यांचा ।। ७ ।।
र्त – कर्तव्यतत्पर जैसे साधक, तैसे लाभे तव योगदान ।
खारीचा वाटा उचली आपुला, उभारण्या हिंदुस्थान ।। ८ ।।
क – कर्म करूया, ना ठेवूया फळाची अपेक्षा ।
‘गुरुचरणी जो लीन, त्यास गुरुकृपेची भिक्षा ।। ९ ।।
– सौ. श्रावणी फाटक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.४.२०२२)