नामजपाचे विस्मरण होऊ नये; म्हणून प्रतिदिन तो आपल्या तळहातावर लिहून घेऊन समष्टीसाठी तळमळीने नामजप करणार्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८९ वर्षे) !
‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतात. अधूनमधून माझी त्यांच्याशी भेट होते. प्रत्येक वेळी भेट झाल्यावर पू. आजी स्वतःच्या प्रकृतीचे कोणतेही गार्हाणे न सांगता माझ्याशी नामजप, साधना आदी विषयांवर बोलतात. पू. आजी समष्टीसाठी वेगवेगळे नामजप करतात.
वृद्धापकाळामुळे बर्याच वेळा त्यांना ‘आज कोणता नामजप करायचा आहे ?’, ते लक्षात रहात नाही. या विस्मरणावर पू. आजी आणि दाते कुटुंबीय यांनी एक छान उपाय शोधला आहे. पू. आजी त्यांच्या सूनबाई सौ. ज्योती नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्याकडून आपल्या तळहातावर प्रतिदिन नामजप लिहून घेतात. तळहातावर सुवाच्च अक्षरांत लिहिलेला हा नामजप वाचून पू. आजी प्रतिदिन आवश्यक तो नामजप करतात.
‘परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव, गुर्वाज्ञापालन करण्याची तळमळ आणि गुरुदेवांनी आरंभलेल्या धर्मकार्यातील अन् हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यांसाठी अखंड नामजप करण्याची सिद्धता, हे पू. दातेआजींमध्ये असलेले गुण सर्व साधकांमध्येही येऊ देत’, अशी परात्पर गुरु डॉक्टर अन् पू. आजी यांच्या कोमल चरणी प्रार्थना !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२३)
आपल्या कुटुंबियांकडून ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना होत आहे ना ?’, याविषयी वेळोवेळी जिज्ञासेने विचारणार्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी !‘सर्व साधकांची साधना चांगल्या प्रकारे व्हावी, याची पू. दातेआजींना पुष्कळ तळमळ आहे. त्यांची दोन्ही मुले आणि दोन्ही सुना पूर्णवेळ साधना करतात. त्या सर्वांची साधना चांगल्या प्रकारे व्हावी आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी पू. आजी वेळोवेळी त्यांच्या साधनेविषयी विचारपूस करतात. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना त्यांच्याकडून होते का ? त्यांनी नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, हे पू. आजी जिज्ञासेने विचारतात. याविषयी केवळ विचारले आणि सोडून दिले, असे न करता त्या प्रयत्नांचा पाठपुरावाही करतात. सर्वसामान्यतः वृद्धापकाळी व्यक्ती स्वतःच्याच कोषात रहाते आणि प्रकृतीच्या विवंचनेत असते. याउलट पू. आजींच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उच्च कोटीचा भाव आहे. त्यामुळे गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करून ‘कुटुंबियांनीही आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे’, यासाठी त्या प्रयत्नशील असतात. वयाच्या ८९ व्या वर्षीही त्यांच्यात असलेली साधनेची तळमळ सर्व साधकांना शिकण्यासारखी आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी घडवलेले असे संतरत्न पाहिल्यावर मला परात्पर गुरुदेव आणि पू. आजी यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२३) |