नवीन शैक्षणिक धोरण जूनपासून राबवणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री
पुणे – राज्यात जूनपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची कार्यवाही केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मातृभाषेतून शिक्षण देणार्या देशांमध्ये सर्वाधिक शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी, तांत्रिक शिक्षण या समवेत वैद्यकीय शिक्षणही मातृभाषेतून दिले जाणार आहे, असे ते म्हणाले.
१. पावसामुळे शेतकर्यांच्या झालेल्या हानीचे पंचनामे सॅटेलाईटच्या साहाय्याने केले जाणार आहेत.
२. मुंबईमध्ये ‘शुद्ध हवा’ हा प्राधान्याचा विषय आहे; मात्र मुंबईवर हक्क सांगणार्यांनी अडीच वर्षात पर्यावरणावर काहीच काम केले नाही. त्यांनी केलेल्या चुका आम्ही सुधारत आहोत. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा आमचा निर्धार आहे.
अशी इतर दोन सूत्रे ही त्यांनी सांगितली.