बाह्य रुग्ण विभाग चालू होऊन १ घंट्यानेही आधुनिक वैद्य येईना !
छत्रपती संभाजीनगर – शहरात संसर्गजन्य रोगांची साथ चालू आहे. कोरोना आणि एच् १ एन् १ संसर्गाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे; मात्र या आरोग्यकेंद्रात अतिशय विदारक परिस्थिती दिसून आली. आधुनिक वैद्य १ घंट्यात न आल्याने रुग्णांना ताटकळत उभे रहावे लागते. या आरोग्यकेंद्रात औषध आणि गोळ्या यांचाही तुटवडा आहे. शहरात महापालिकेची एकूण ४० आरोग्यकेंद्रे आहेत. यातील अनेक केंद्रांवर आधुनिक वैद्य वेळेत येत नाहीत. रुग्ण सकाळपासून त्यांची वाट पहात उभे असतात. बहुतांश केंद्रांवर हीच परिस्थिती असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.