भगवान परशुराम परिक्रमेस पुणे येथून प्रारंभ !
पुणे – ‘श्री भगवान परशुराम जन्मोत्सवा’निमित्त गेले ८ वर्षे नगर ते भगवान परशुराम जन्मस्थान जनापाव (मध्यप्रदेश) अशी परिक्रमा काढली जाते. या वर्षीपासून ही परिक्रमा पुणे येथून प्रारंभ होऊन नगर – छत्रपती संभाजीनगर – माहूर मार्गे जनापाव येथे जाणार आहे. याचा प्रारंभ १२ एप्रिलला पुण्यातील मानाचा पाचवा गणपति श्री केसरी वाडा येथील श्री गणपति आणि भगवान परशुराम यांची आरती करून झाला. ‘परशुराम सेवा संघा’च्या पुढाकाराने या वर्षी ही यात्रा निघत आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते श्री. संदीप खर्डेकर, लोकमान्य टिळकांचे वंशज श्री. शैलेश टिळक, परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजित देशपांडे, कार्याध्यक्ष श्री. उपेंद्र जपे, प्रदेश सरचिटणीस श्री. ऋषिकेश सुमंत, पुणे जिल्हाध्यक्ष श्री. सागर मांडके यांसह अन्य उपस्थित होते.