भारतात नियम पाळावे लागतील अन्यथा कारागृहात जावे लागेल ! – ट्विटरचे इलॉन मस्क यांची स्पष्टोक्ती
नवी देहली – भारतात सामाजिक माध्यमांवर कठोर निर्बंध आहेत. त्यामुळे आमचे संकेतस्थळ अमेरिका किंवा इतर पाश्चात्त्य देशांतील ट्विटर वापरकर्त्यांना जेवढे स्वातंत्र देते, तेवढे समान स्वातंत्र्य भारतीय ट्विटर वापरकर्त्यांना देऊ शकत नाही.
ट्विटर आस्थापन कधी कधी भारतात काही मजकूर संपादित (सेन्सॉर) करते, तसेच काही मजकुरावर बंदी (ब्लॉक) घालते. त्यामुळे आम्ही एका देशाच्या नियमांच्या विरोधात जाऊ शकत नाही. एकतर आमचे लोक कारागृहात जातील किंवा आम्हाला नियम पाळावे लागतील, असे दोनच पर्याय आमच्याकडे असतील, तर आम्ही नियमांचे पालन करू, असे ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले आहे.
“नियम पाळा नाहीतर तुरुंगात जा”, भारतातील सोशल मीडिया सेन्सॉरशिपबद्दल इलॉन मस्क यांचं मोठं विधानhttps://t.co/TLwux1Yzcg
— LoksattaLive (@LoksattaLive) April 12, 2023
इलॉन मस्क मागील काही दिवसांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्यसाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. ट्विटर आस्थापन विकत घेतल्यानंतर त्यांनी बंदी घातलेली अनेक ट्विटर खाती पुन्हा चालू केली आहेत; मात्र भारतातील सामाजिक माध्यमांविषयीच्या नियमांविषयी त्यांनी ‘आम्ही या नियमांचे पालन करू’, असेच म्हटले आहे.