महाविकास आघाडीच्या नागपूर येथील सभेच्या विरोधात नागरिकांची नागपूर खंडपिठात जनहित याचिका !
आंदोलन करताना स्थानिक रहिवासी
नागपूर – महाविकास आघाडीच्या १६ एप्रिल या दिवशी होऊ घातलेल्या वज्रमूठ सभेसाठी दर्शन कॉलनी सद्भावनानगर येथील मैदानाची निवड करण्यात आली आहे; मात्र स्थानिक नागरिकांनी या मैदानावर सभा घेण्यास विरोध दर्शवला आहे. महाविकास आघाडीच्या सभेविरोधात स्थानिक नागरिकांनी नागपूर खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. असे असतांनाही महाविकास आघाडी मात्र दर्शन कॉलनी येथील मैदानावरच वज्रमूठ सभा घेण्यावर ठाम आहे. या वज्रमूठ सभेच्या प्रचारासाठी छोटे रथ फिरायला प्रारंभ झाला आहे.
MVA Nagpur Sabha : नागपुरच्या दर्शन कॉलनी मैदानावर मविआच्या सभेला स्थानिक नागरिकांचा विरोध #MVA #nagpur #mvasabha https://t.co/NG1GY43AgE
— Lokshahi Marathi (@LokshahiMarathi) April 11, 2023
Nagpur MVA Sabha | दर्शन कॉलनीच्या मैदानावर 16 तारखेला मविआची वज्रमूठ सभा#nagpur #mva #sabha pic.twitter.com/qbtd55PBHZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 11, 2023
दर्शन कॉलनी येथील मैदान परिसर हा रहिवासी भाग आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि या भागात असलेल्या रुग्णांचा विचार करता या मैदानावरील सभेची अनुमती नाकारावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.