सातार्यात ७ जणांच्या टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई !
सातारा, १२ एप्रिल (वार्ता.) – सातारा आणि पुणे जिल्ह्यांत गंभीर गुन्हे करणार्या सातारा जिल्ह्यातील ७ जणांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील उंब्रज, कराड शहरांसह पुणे जिल्ह्यातील निगडी आणि भारती विद्यापीठ परिसरातील पोलीस ठाण्यांत ७ जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये हत्येचा प्रयत्न, हत्या, खंडणी, दरोडा, चोरी यांचा समावेश आहे. मयुर साळुंखे, पंकज यादव, शाहरुख मुल्ला, सूरज जाधव, अक्षय कोरे, प्रकाश यादव आणि अमोल जाधव अशी गुन्हे करणार्यांची नावे असून त्यांच्याविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता.