स्वयंपाकासाठी वापरण्यात येणार्‍या गॅसचा वापर रिक्शा चालवण्यासाठी होत असल्याचे उघड !

वळसंग येथे अवैधपणे स्वयंपाकगृहातील गॅस रिक्शामध्ये भरतांना पोलिसांनी केलेली कारवाई

सोलापूर – स्वयंपाकगृहामध्ये वापरण्यात येणार्‍या गॅसच्या टाकीमधील गॅस अवैधपणे रिक्शामध्ये भरतांना पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी नितीन यादगिरी, जाफर ईस्माईल कारगिर, आदिल रफिक शेख आणि विजय गणपा या चौघांच्या विरोधात वळसंग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिक्शा, ईलेक्ट्रिक मोटार, पाईप, नोझल, वजनकाटा, ७ गॅसच्या टाक्या, १ रिकामी टाकी असा एकूण १ लाख ७६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.