पिंपरी-चिंडवडच्या (पुणे) सायबर विभागाकडून दिग्गज नेत्यांचे छायाचित्र, व्हिडिओ ‘मॉर्फ’ करणार्‍या धर्मांधाला अटक !

आरोपी शमीम (मध्यभागी)

(‘मॉर्फ’ व्हिडिओ / छायाचित्र म्हणजे एका व्यक्तीच्या शरीराच्या एका भागाला दुसर्‍या व्यक्तीच्या शरीराचा भाग जोडणे यांसारखे किंवा आवाजात पालट करून व्हिडिओ बनवणे)

पिंपरी- चिंचवड (जिल्हा पुणे) – दिग्गज नेत्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ ‘मॉर्फ’ करून ते ‘यू ट्यूब’वर प्रसारित करणार्‍या शमीम अन्सारी याला पिंपरी-चिंचवडच्या सायबर विभागाने अटक केली आहे. शमीम याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्हिडिओ अश्लील स्वरूपात ‘मॉर्फ’ केले होते. भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी या प्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या सायबर विभागात तक्रार केली होती. आरोपी शमीमला सायबर पोलिसांनी झारखंड येथील रांची येथून स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने अटक केली आहे. (तक्रार केल्यावर नको, तर त्यापूर्वी कारवाई करणारे पोलीस हवेत ! – संपादक)

अशा गोष्टींना पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारला निवेदन दिले असून ‘याविषयी सकारात्मक भूमिका घेऊ’, असे आश्वासन केंद्र सरकारने साबळे यांना दिले आहे. आरोपी शमीमने साबळे यांचे फेसबुक खाते ‘हॅक’ केले होते. देशातील राजकीय नेत्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ ‘मॉर्फ’ करून आक्षेपार्ह पद्धतीने वापरणे हा गुन्हा आहे, अशी माहिती सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी दिली आहे.