सय्यदनगर (पुणे) येथे पशूवधगृहावर धाड, ३ धर्मांधांसह अन्य २ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !
हडपसर (जिल्हा पुणे) – येथील सय्यदनगर येथे मोठ्या प्रमाणात गाय, बैल यांची कत्तल होणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शादाब मुलाणी, मंगेश चिमकर, ओंकार जाधव आणि निखिल दरेकर यांनी वानवडी पोलिसांच्या साहाय्याने तेथील पशूवधगृहावर धाड टाकली असता एका खोलीमध्ये ४ व्यक्ती धारदार शस्त्राने गायींची कत्तल करतांना दिसून आल्या. तसेच २ खिल्लार जातींचे गोवंश अर्धवट कापलेल्या अवस्थेत, ६०० किलो मांस रिक्शामध्ये, तसेच घटनास्थळी चाकू, गोवंशाची कातडी, मुंडकी, पाय अन् अर्धवट सोलून ठेवलेले गोवंशाचे मांस आणि नाल्यात गोवंशियांचे रक्त आढळले. या प्रकरणी कलीम कुरैशी, जलील कुरेशी, अय्युब कुरेशी आणि इतर २ जण यांच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाज्या महाराष्ट्रात ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्रात आज प्रतिदिन दिवसाढवळ्या गोहत्या होत आहेत, ही लज्जास्पद गोष्ट आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही प्रशासन केव्हा करणार ? |