अल्पसंख्यांकांचे लाड पुरे !
अमेरिका, फ्रान्स आदींसह इस्लामी देशांना भारतातील अल्पसंख्य मुसलमानांविषयी फार कळवळा असतो. भारतात अल्पसंख्यांकांवरील कथित अन्यायावरून हे देश नेहमी हिंदूंच्या विरोधात गरळओक करत असतात. ‘भारत अल्पसंख्यांकांना रहाण्यासाठी अत्यंत असुरक्षित आहे’, ‘तेथे अल्पसंख्यांकांवर आक्रमणे होतात’, ‘त्यांना मूलभूत सोयीसुविधाही धड पुरवल्या जात नाहीत’, असे कपोलकल्पित चित्र रंगवून वरील देश भारताची नियोजनबद्ध अपकीर्ती करत असतात. आजपर्यंत आपण याकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले. ‘एक खोटे १०० वेळा सांगितल्यावर ते खरे वाटू लागते’, या ‘गोबेल्स’ नीतीनुसार या अपप्रचाराला भारताने त्या देशांना समजेल, अशा भाषेत यापूर्वीच उत्तर द्यायला हवे होते. तसे उत्तर अलीकडच्या काळात द्यायला आपण आरंभ केला आहे, हे अभिनंदनीय आहे. याच सूत्रावरून भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी वॉशिंग्टन (अमेरिका) येथील ‘पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’ या केंद्रात आयोजित केलेल्या ‘भारतातील आर्थिक वाढी’विषयीच्या संवादात बोलतांना देशाची अपकीर्ती करणार्यांना खडेबोल सुनावले. ‘जे कधीही भारतात आलेले नाहीत, अशा लोकांनी ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे चित्र निर्माण केले आहे. भारत हा जगातील मुसलमानांची दुसर्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात जर मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का ?’, असा रोखठोक प्रश्न त्यांनी उपस्थित करून भारतद्वेष्ट्यांचे पितळ उघडे पाडले. वास्तविक भारतविरोधी अपप्रचार नियोजनबद्धपणे केला जातो. या माध्यमातून अन्य मुसलमान देशांना भारताविरुद्ध भडकावले जाते आणि अमेरिका, फ्रान्स यांसारखे ख्रिस्तीबहुल देश त्यात नेहमी तेल ओतण्याचे काम करतात. अशा प्रकारचे भारतविरोधी मत निर्माण करण्याचे काम अमेरिका, फ्रान्स यांसारखे देश भारतद्वेषी अहवालांच्या माध्यमातून, तर तुर्कीये, कतार, कुवेत, सौदी अरेबिया, इराण आदी कट्टर इस्लामी देशांमध्ये इस्लामधार्जिण्या प्रसारमाध्यमांतून केले जाते. मध्यंतरी भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ कतार आणि कुवेत या देशांनी तर थेट तेथील भारतीय उच्चायुक्तांना पाचारण करून त्यांना समज दिली. सांगायचे तात्पर्य म्हणजे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतविरोधी षड्यंत्र आहे.
भारतद्वेष्ट्या देशांना आरसा दाखवा !
जे देश भारताला अपकीर्त करत आहेत, त्यांना भारतानेही आरसा दाखवण्याची आवश्यकता आहे. या देशांतील अल्पसंख्यांकच खर्या अर्थाने असुरक्षित आहेत. त्यांच्या मानवाधिकारांचेच खर्या अर्थाने उल्लंघन केले जात आहे. अमेरिकेत गोर्यांकडून नेहमी कृष्णवर्णियांवर अनन्वित अत्याचार केले जातात. अमेरिकेत कृष्णवर्णियांविषयी इतका पराकोटीचा द्वेष केला जातो की, गोर्या पोलिसांकडून त्यांना थेट ठार मारले जाते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश यांसारखे इस्लामी देश तर तेथील अल्पसंख्य हिंदूंसाठी पृथ्वीतलावरचा नरकच समजले जातात. जेवढे अत्याचार इस्लामी देशांतील अल्पसंख्य हिंदूंवर केले जातात, तेवढे कुठल्याही देशात अन्यांवर केले जात नसतील. म्हणूनच तर फाळणीनंतर पाकमधील हिंदूंच्या लोकसंख्येत कमालीची घट होऊन तेथे आता जेमतेम एक-दोन टक्के हिंदू शेष आहेत. इस्लामी देशांमध्ये हिंदूंना तर लक्ष्य केले जातेच; पण त्यांचे धर्मग्रंथ, श्रद्धास्थाने, देवतांच्या मूर्ती यांची सातत्याने तोडफोड केली जाते. याविषयी मात्र सर्व जण गप्प बसतात. अशात निर्मला सीतारामन् यांनी वरील कार्यक्रमात उपस्थितांसमोर पाकमधील अल्पसंख्यांकांच्या कथन केलेल्या दुःस्थितीमुळे पाकचे पितळ उघडे पडले. सीतारामन् म्हणाल्या, ‘‘जेव्हा भारताची फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तानचीही निर्मिती झाली. पाकिस्तानने स्वतःला ‘इस्लामी देश’ घोषित केले. त्या वेळी ‘अल्पसंख्यांकांना संरक्षण दिले जाईल’, असे पाकने सांगितले; परंतु आज तेथे सर्वच अल्पसंख्यांक समुदायांची संख्या न्यून होत आहे.’’
सवलती आणि विकृती !
याउलट स्थिती भारतातील अल्पसंख्य मुसलमानांची आहे. भारतात त्यांना सर्व सोयीसुविधा तर आहेतच; परंतु बहुसंख्य हिंदूंवर ते धर्माच्या आधारे सातत्याने कुरघोडी करत असतात. ‘या देशातील साधन-संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे आश्वासन त्यांना थेट काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधानांकडून मिळाले. ‘वक्फ बोर्डा’च्या कायद्याद्वारे देशभरातील केवळ हिंदूंच्याच नाही, तर कोणतीही सरकारी भूमी स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगण्याचे अमर्याद अधिकार त्यांना भारतात बहाल केले गेले आहेत. देशात कुणाला नाही; पण मुसलमान पुरुषांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याचा अधिकार भारतात आहे. मदरशांना सरकारी अनुदान मिळते. अशा प्रकारे सरकारी स्तरावरून त्यांची सरबराई चालूच आहे. दुसरीकडे धर्मांध स्वसंरक्षण करण्याच्या नावाखाली बाँब बनवू शकतात, खुलेआम रस्त्यावर ठाण मांडून आंदोलने करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून कायद्याचे उल्लंघन करत पहाटे अजान देऊ शकतात, १० मिनिटांत हिंदूंना संपवण्याची भाषा करू शकतात, श्रीरामनवमीला दंगली घडवू शकतात, हिंदूंना उघडपणे ‘सर तन से जुदा’च्या (डोके शरिरापासून वेगळे करण्याच्या) धमक्या देऊ शकतात आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृतीही करू शकतात. तरीही त्यांना भारतात असुरक्षित वाटते, हे विशेष ! निर्मला सीतारामन् यांनी भारतातील अल्पसंख्यांकांचा हा उद्दामपणा जगासमोर मांडायला हवा होता. यासह ‘ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांनी त्यांना सुरक्षित वाटणार्या देशात खुशाल निघून जावे. त्यांना पोचवण्याची व्यवस्था भारत करील’, असेही ठणकावून सांगायला हवे होते. अल्पसंख्यांकांचे लाड आता पुरे झाले. प्रत्यक्षातही असे केल्यासच हे लोक वठणीवर येतील आणि मग भारताविरुद्ध बोलण्याचे धाडस कुणालाही होणार नाही !
अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा मोडून काढण्यासाठी त्यांना देण्यात येणार्या विशेष सोयीसुविधा सरकारने बंद करणे आवश्यक ! |