पुणे येथील ‘न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर’ शाळेतील पालकसभेमध्ये सनातनच्या ग्रंथांविषयी मार्गदर्शन
पालकांचा ग्रंथप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे – येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर’ या शाळेच्या प्रांगणात १ एप्रिल या दिवशी मोठ्या आणि ८ एप्रिल या दिवशी छोट्या गटातील विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी विद्यार्थ्यांना उपयोगी असलेल्या सनातनच्या ग्रंथांची माहिती संस्थेच्या सौ. अनुराधा पाटील यांनी सांगितली. त्याचा अनुमाने ४०० पालकांनी लाभ घेतला. या वेळी ‘मुलांचे संगोपन, विकास आणि संस्कार’ विषयक ग्रंथ, तसेच ‘सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत’ या ग्रंथांची माहिती पालकसभेत देण्यात आली. या विषयावर लावलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वैशिष्ट्यपूर्ण
१. ‘सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत’, या ग्रंथास पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
२. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अमिता दाते यांना संपर्क करून ग्रंथांची माहिती सांगण्यात आली. त्या वेळी त्यांना ‘सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत’ हा ग्रंथ आणि संस्थेचा अक्षर संशोधनाचा विषय आवडला. त्यांनी लगेचच दोन्ही गटांतील पालकसभेत ग्रंथप्रदर्शन लावण्यास अनुमती दिली, तसेच पालकसभेत या ग्रंथांची माहिती सांगण्यास सुचवले.
३. हे ग्रंथ अनेक पालकांपर्यंत जाऊन मुलांना त्याचा लाभ व्हावा, या दृष्टीने सौ. दाते यांनी ग्रंथप्रदर्शन लावण्यास सर्वतोपरी साहाय्य केले. शाळेच्या शिक्षिका सौ. श्रद्धा खोले आणि अन्य शिक्षक यांचेही सहकार्य लाभले.